स्वादात अनिवार्य, सुक्या मासळीचा परिपूर्ण आनंद !

मकरसंक्रांती २०२५

WhatsApp
Facebook
Threads

संक्रांतो यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवैः । तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि॥

देवीपुराणातील या श्लोकाप्रमाणे जे लोक मकर संक्रातीच्या दिवशी दान देतात तेच दान सूर्यदेव त्यांना त्यांच्या प्रत्येक जन्मात देतात, यानुसार पूर्वीच्या काळी लोक एकमेकांना धान्य, वस्त्र, अन्न यांचे वाटप करत पण बदलत्या काळानुसार आता या यादीमध्ये विद्यादान, रक्तदान, अवयवदान आणि याचबरोबर आरोग्यदायी आहाराचे दान करणेही आवश्यक झाले आहे.
 
मकर संक्राती हा सण तर ‘विसरा व माफ करा’ म्हणजेच एकमेकांबद्दल असलेले हेवेदावे, वाद विसरून जावा आणि मोठ्या मनाने त्यांना माफ करून नात्यातील स्नेह वाढवा हा संदेश देणारा आनंदाचा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरायणात म्हणजेच उत्तर दिशेला प्रयाण करतो किंवा तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाश लवकर येतो आणि संध्यकाळी उशिरापर्यंत राहतो यालाच आपण संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान झाली अस म्हणतो.
हल्लीच्या काळात इलेक्ट्रिसिटी मुळे सूर्यप्रकाशाचा आपल्या कामावर म्हणावा असा फरक पडत नाही परंतू पूर्वीच्या लोकांना शेतातील कामे, प्रवास करण्यासाठी सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेच नियोजन करून ती कामे पार पाडावी लागत असे, त्यामुळेच मकरसंक्रांतीनंतर दिवस मोठा झाल्याने त्यांना कामासाठी जास्त वेळ मिळत असे हे ही एक कारण या सणाच्या आनंदामागे असे..
लोकांच्या उदरनिर्वाहा संबंधित जोडला गेल्यामुळे भारतातील जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये आणि जगातील काही देशांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने पण कन्सेप्ट मात्र सारखीच अशा पद्धतीने साजरा केला जातो. मकर सक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये मधे बिहू, पंजाबम मधे लोहरी, हिमाचल प्रदेशमध्ये मधे साजी, जम्मूमध्ये मधे संग्रांद किंवा उत्तरायण म्हणतात. हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात पोंगल, नेपाळ मध्ये संक्रांती, थायलंड मधे सोंगक्रान, म्यानमार मध्ये थिंगयान, कंबोडिया मधे सोंगक्रान, अशा इतरही देशांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.
तसे पाहता भारतातील जवळपास सगळेच सण निसर्गाला पूरक, निसर्गाचे संधारण आणि संरक्षण साधणारे आणि त्याचबरोबर प्राणी आणि मानवी आरोग्याचे हित जपणारे आहेत संक्रांत सण जानेवारी महिन्याच्या मध्यात आणि मराठी कालगणनेनुसार पौष महिन्यात येतो या दिवसात भारतात सर्वत्र हिवाळा ऋतू चालू असतो आणि वातावरणातील तापमान कमी असते,  त्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात कॅलरीज आणि प्रोटिन ची गरज असते आणि ते योग्य प्रमाणात मिळाले नाही तर कोणतेही काम करताना थकवा येणे, चेहऱ्याचे तेज कमी होणे, स्नायूंची झीज होऊन अंगदुखी होणे, शरीराची हालचाल करताना प्रचंड वेदना होणे उद्भवते.
गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील  60% महीलांमध्ये वयाच्या 30 वर्षानंतर शरीरातील कॅल्शियम कमी होते व त्यामुळे अंगदुखीसारखे आजार मागे लागतात.
ह्या अशा आजारातून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर आपल्याला आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन B6, फॉस्फरस, व्हिटॅमिन D, ओमेगा 3, फॅटी एसिड या पोषणमूल्यांचा आपल्या आहारात समावेश करणे अत्यंत गरजेच आहे. अशाच काही पदार्थांचा आपण थोडासा अढावा घेऊयात.
सुक्या माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, एनर्जी, आयर्न असतात हे आपल्याला माहीतच आहे, त्यापैकी वाळलेल्या बोंबील या माशामध्ये सरासरी 1390 mg कैल्शियम प्रत्येकी 100 ग्रॅम वजनामागे असते, व्हिटॅमिन मुळे तुमच्या शरीराचा थकवा कमी होतो, रोग प्रतिकार शक्ती वाढते, शरीरामध्ये नवीन ऊर्जा निर्मिती होते, केसांचे आरोग्य उत्तम राहते बोंबला मधून मिळणाऱ्या कॅल्शियम मुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
पचनसंख्या सुरक्षित राहते तसेच फॉस्फरस मूळे मूळ की लहान मूलांच्या वाढीचे, आणि आरोग्याचे प्रमाण बोंबलाचे सेवण न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत प्रभावीपणे चांगले आहे,  तसेच बांगडा म्हणजेच कानीट यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारे ओमेगा 3 फॅटी कैसिड मिळते. त्यामुळे हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक अरिथामिया या आजारांपासून आपण दूर राहू शकतो. बांगड्याच्या सेवनाने मिळणाऱ्या व्हिटॅमिन डी मुळे कॉलोन कॅन्सर शी लढणाऱ्या रुग्णांना बरे होण्यास खुप फायदेशीर ठरते. एका सर्वेनुसर कॅन्सर शी लढणाऱ्या रुग्णांच्या रक्तात व्हिटॅमिन डी च्या आधिक प्रमाणामुळे ते आजारातून लवकर बरे होतात, त्यामुळे कॅन्सर शी लढणाऱ्या रुग्णांना बांगडा माशाचे सेवन हे संजीवनीच ठरू शकते. डॉक्टरांच्या मते आठवड्या तून किमान दोन वेळा अशा माशांचे सेवन करणे शरीराला खुप फायदेशीर ठरू शकते. अशाच इतर सुख्ख्या मासळी मधून शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्ये आपण मिळवू शकतो आणि या आजारांपासून स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना दूर ठेवू शकतो, चला तर मग आजच ऑर्डर करूयात आणि संक्रांतीचे आरोग्यदायी स्वतः ला आणि प्रियजनांना देऊन आनंदा सोबत आरोग्य व्दिगुणित करूया.

आजच खरेदी करा ! - खारे मासे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

ऑर्डर करा !WhatsApp वरून

Scroll to Top