WhatsApp
Facebook
Threads
चला तर मंडळी आज सोड्याची मस्त अशी चमचमीत भाजी बनवूया, नमस्कार मंडळी मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मूड एंड फूड मराठी.
तर आजच पार्सल आपल्याला रिवा अॅग्रो यांच्या कडून आलेला आहे, ते खारे मासे विकतात थेट कोकणातून आणतात. तर आजच पार्सल आमच्या कारभाऱ्यांचं फेवरेट होत, त्याच्यात मी घरा बाहेर होते तोपर्यंत कारभाऱ्यांनी ते अनबॉक्सिंग केल त्यांना सांगितले होत की करू नका म्हणून तरी सुद्धा केल आणि बघू शकता मस्त असे खारे मासे आलेले आहेत.
साहित्य -
- 200 ग्रॅम सुके सोडे
- 2 कांदे बारीक चिरलेले
- चवीनुसार मीठ
- 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- 2 टोमॅटो मोठे मोठे चिरलेले
- वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर
- आल लसूण पेस्ट
-
बेडगी मिरची पावडर
-
हळद
-
धने पावडर
-
गरम मसाला
-
घाटी मसाला / कांदा लसूण मसाला /मालवनी मसाला / काळा मसाला / गोडा मसाला
-
चिकन मसाला
कृती :
तर त्यांना विचारले मी आता एवढ आलय माणसाने ओपन केल तर म्हटलं विचारावं की बाबा काय पाहिजे? तर कारभारी म्हटले सोडे बरेच दिवस झाले खाल्ले नाही. तर सोडे बनवूया ! मस्त आता कारभाऱ्यांसाठी, टिफिन साठी सुद्धा बनवले मग दोन टिफिन होते तर दोन वाटी टिफिन साठी एक वाटी कारभाऱ्यांसाठी, अन तीन वाटी मी गरम पाण्यामध्ये सोडे भिजत घातले. सोडे गरम पाण्यात भिजत घातले ना की त्याच्या वरची माती, कचरा वगैरे असेल तर तो निघतो आणि सोडे मऊ व्हायला मदत होते, शिजायला मदत होते, सोडे मऊ होतात.
सोडे (सुकवलेली कोळंबी – Dried Prawns)
₹450.00 – ₹1,800.00Price range: ₹450.00 through ₹1,800.00
Select options
This product has multiple variants. The options may be chosen on the product page
तर इथ 15 ते 20 मिनिट तरी सोडे भिजत घालायचे. नंतर एका कढई मध्ये मी तेल घेतलं त्याच्या मध्ये दोन मोठे मोठे बारीक चिरलेले कांदे घातले मीठ घालून कांदा छान भाजून घेतला. मीठ मी एकदाच घातलं भाजीला जेवढं लागणार आहे, 50 वेळा घालत बसत नाही, नाहीतर अंदाज चुकतो म्हणून एकदाच घातले आहे आणि कांदा छान लालसर असा पपरतून घेतला आहे गुलाबी होईपर्यंत. जास्त ब्राउनिश वगैरे करत बसायचं नाही तर कांदा गुलाबी सर झाला की त्याच्या मध्ये भिजवून घेतलेले सोडे घालायचे. पाच मिनिट सोडे सुद्धा छान परतून घ्यायचे नंतर याच्या मध्ये दोन मोठे मोठे चिरलेले टोमॅटो घालायचे. मोठे मोठे टोमॅटो बारीक चिरून घाला आणि मस्त ते सुद्धा हलवून घ्यायचे टोमॅटो चांगला गळावा म्हणून झाकण ठेवा आणि पाच मिनिट छान वाफ द्यायचे म्हणजे टोमॅटो सुद्धा चांगला गळून जातो बघू शकता मस्त असा टोमेटो सुद्धा शिजला आहे.
आजच खरेदी करा ! - खारे मासे
छान अस परतून एकदा मिक्स करून घ्या, कोथिंबीर घालायची – बरेच लोक आता तुम्ही म्हणाल कोथिंबीर कशाला तर अस परत त्यात कोथिंबीर घातली ना तर ती चांगली होते, अस म्हणतात बाबा आमची माणस मग काय माहिती?
तर कोथिंबीर घातली मी छान हलवून घेतल आता जग भरात मसाले घालायचे आहेत. मी इथं आल लसूण पेस्ट, बेडगी मिरची पावडर, हळद घातली आहे. धने पावडर घातली आहे, गरम मसाला घातला आहे, घाटी मसाला घातला आहे. घाटी मसाला नसेल तुमच्याकडे तर कांदा लसूण मसाला, मालवनी मसाला किंवा काळा मसाला, गोडा मसाला. कुठला ह्याव मसाला, त्याव मसाला तुमचा घरगुती मसाला घाला काहीही प्रॉब्लेम नाही.
सगळ्यात शेवटी मी चिकन मसाला घातला आणि सगळे मसाले कसे सोड्याच्या कना कनाला लावून घेतले. अस मस्त सगळं कस मिक्स केल तर बघू शकता मस्त असे सोडे आणि मसाले एकत्र मिक्स झालेले आहेत. नंतर याच्या मध्ये पाणी घालायचा आहे सोड शिजायला जरा जास्त पाणी लागत. तर मी इथ दोन ग्लास पाणी घातले आहे. एक हे ग्लास घातले आहे आणि एक आल लसूण पेस्ट जी बनवली होती मी त्या मिक्सर च भांड मध्ये एक ग्लास विसळून घातला आहे. तर मस्त अस पाणी घालून चांगल 20 मिनिट शिजून द्यायचं मदे मदे हलवायच नाहीतर सोडे बाबा लागतील तुमचे तळाला.
तर बघू शकता 20 मिनिटानंतर आपली सोड्याची भाजी तयार आहे. सोडे म्हणाल, भाजी म्हणलेले बऱ्याच लोकांना नाही आवडत. तर आपले मस्त असे सोडे तयार झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा कोथिंबीर घालायची आणि बघू शकता मस्त अशी चमचमी भाजी तयार आहे. अशी प्लेट मध्ये serve करायची फोटो काढायचे, स्टेटसला ठेवायचे आणि शेजाऱ्यांना पाजार्यांना, नातेवाईकांना जळवायचं, बघा आम्ही कस चमचमी खातो म्हणून.








