सुकट (बारीक कोळंबी) किंवा बोंबील आपण हाडांसकट खातो. यामधून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते.
खनिजे आणि जीवनसत्त्वांचा साठा
सुक्या मासळीत आयर्न (लोह), झिंक आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात.लोहामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण (Hemoglobin) वाढण्यास मदत होते.
प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत
ताजी मासळी सुकवल्यानंतर त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वांची घनता वाढते. सुक्या मासळीमध्ये उच्च दर्जाचे ‘लीन प्रोटीन’ असते.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचे वरदान
सुक्या मासळीमध्ये, विशेषतः सुरमई सारख्या प्रकारांमध्ये Omega-3 Fatty Acids मुबलक प्रमाणात असतात. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत.