WhatsApp
Facebook
Threads
हे बघा आज आपण मस्तपैकी चमचमीत असे सुके सोडे तयार केलेले आहेत आणि अगदी घरगुती स्टाईलने तयार केलेले आहेत त्याच्यामुळे याचा स्वाद आहे ना एकदम जबरदस्त तयार झालेला आहे
नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे चमचमीत सुके सोडे मसाला आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद
साहित्य -
- 200 ग्रॅम सुके सोडे
- 2 कांदे बारीक चिरलेले
- 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- 1 टोमॅटो मध्यम काप केलेले
- वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर
- 2 ½ tblsp ठेचलेले लसूण
- 3~4 कोकम पाकळ्या
- 2 ½ table spoon घरगुती लाल मसाला
- 1 tsp हळद
- ¼ tsp हिंग
- चवीनुसार मीठ
कृती :
मी टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, मी कोकमाच्या दोन ते तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे
त्यानंतर मी इथे रिवा अॅग्रोचे सोडे घेतलेले आहेत,आपला हा घरगुती मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी इथे हळद घेतलेली आहे हिंग आणि हे चवीनुसार मीठ.
सोडे (सुकवलेली कोळंबी – Dried Prawns)
₹475.00 – ₹1,900.00Price range: ₹475.00 through ₹1,900.00
Select options
This product has multiple variants. The options may be chosen on the product page
कृतीला सुरुवात करूया तर आता सोडे बनवण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोमट पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि कोमट पाणी तयार झाल्याच्या नंतर रिवा अॅग्रो या पॅकेट मधून हे चांगल्या क्वालिटीचे सोडे आहेत हे आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत.
तुम्ही सोड्यांची क्वालिटी बघा एक नंबर सोड्या आहेत जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे सोडे आपल्या घरच्यासाठी शोधत असाल तर रिवा अॅग्रो मधून लगेच मागवू शकता, खाली WhatsApp नंबर दिलेला आहे, लगेच ऑर्डर करा!
सोड्यांसोबत ह्यांच्याकडे बरेचशे सुक्या मासळीचे व्हरायटी सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर आज आम्ही इथे सोडे ऑर्डर केलेले आहेत.
आजच खरेदी करा ! - खारे मासे
हे जे सोडे आहेत आता आपण हे कोमट पाण्यामध्ये घालूया आणि कोमट पाण्यामध्ये घातल्याने काय होईल माहिती आहे का आपले तीन काम होतील
- हे जे सोडे असतात हे असतात ते सॉफ्ट होण्यामध्ये मदत होईल
- दुसरी गोष्ट म्हणजे उन्हामध्ये हे सुकत असताना त्याच्यावरती डस्ट वगैरे असते किंवा दुसरे काही कण वगैरे असतात ते चिकटलेले असतात तर ते कोमट पाण्यामुळे लूज होऊन हे तळाला बसतात त्याच्यामुळे हे सोडे साफ होण्यामध्ये सुद्धा मदत होते
- आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोड्यांचा जो काही उग्र वास असतो तो कमी होण्यामध्ये मदत होते पूर्णपणे जाऊ शकत नाही पण येस थोडाफार कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होईल
तर हे तीन काम आपल्याला ह्या कोमट पाण्यामध्ये हे सोडे घातल्याने होऊ शकतात आता 20 मिनिटे झाल्याच्या नंतर आपण हे दोन-तीन पाण्यामध्ये धुऊन घेऊया
तर हे बघा मी सोडे आहेत ना ते स्वच्छ करून घेतलेले आहेत तीन पाण्यामध्ये मी धुऊन घेतलेले आहेत तर इथे बघा मी कढईमध्ये चांगलं तेल तापून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कांदा घालूया त्यानंतर हिरवी मिरची आता हे थोडं परतून घेऊया
आता थोडासा कांदा परतल्याच्या नंतर यामध्ये आपण हिंग घालूया कारण सुके सोडे आहेत ना म्हणून हिंग आहे ना तो गरजेचा आहे परतून घेऊया आता बघा साधारण मी कांदा आहे ना तो थोडा मऊ करून घेतलेला आहे
आता यामध्ये आपण लसूण घालूया आणि बघा सुके सोडे आहेत ना म्हणून आपल्याला लसूण आहे ना तो ठेचूनच घालायचा आहे वाटून वगैरे नाही घालायचा आहे ठेचून घातला का कसा चवीला लागतो क्या बात है
लसूण साधारण दोन मिनिटं परतल्याच्या नंतर आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि टोमॅटो घालूया परतून घेऊया आणि आता कांदा आणि टोमॅटो हे आपल्याला ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे
हे बघा मी टोमॅटो आणि कांदा आहे ना तो बऱ्यापैकी शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया हा घरगुती मसाला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ दोन ते तीन कोकम आता हे थोडसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सोडे घातल्याच्या नंतर सोड्या सोबत सुद्धा टोमॅटो आणि कांदा अजून बऱ्यापैकी चांगला शिजून निघेल
हो तर चला आता आपण रिवा अॅग्रोचे सोडे घालूया आता परतून घेऊया आता बघा सोडे आहेत ना ते परतून घेतलेले आहेत तर आता काय करूया यामध्ये ना गरम पाणी घालूया आणि साधारण एक कपभरच घालायचं आपल्याला पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊया
आता परतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि मध्ये ना परतत सुद्धा राहायचं आहे नाहीतर खाली मसाला आहे ना तो लागू सुद्धा शकते आणि गॅस आपल्याला ना बारीक ठेवायचा आहे
चला आता झाकण खोलूया हो जबरदस्त हे बघा आपले सोडे आहेत ना ते तयार झालेले आहेत आणि किती मस्त भारी दिसतात चमचमीत आणि मध्ये ना मी परतत सुद्धा राहिलेली आणि एक तुम्हाला एक गोष्ट सांगू ह्याच्यामध्ये तुम्ही जर वांग बटाटा असं घातलं ना एकदम भारी होते मी साध्या प्रकारे दाखवलेली आहे
क्या बात है आता आपण गॅस बंद करून घेऊया पहिली किती एकदम जबरदस्त रेसिपी आहे ना आता फक्त भाकरी तयार होण्याची वाट बघतोय कारण का आत्ताच तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही काय करा पटकन तर लागा आणि हे सोडे मस्तपैकी आपल्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका
पण त्या अगोदर आपला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू






